सततच्या कॉल ड्रॉप मुळं नागरिक हैराण, ग्राहकांचे होतेय आर्थिक नुकसान

7

बारामती, ६ ऑक्टोंबर २०२०: बारामती शहरात मागील काही दिवसांपासून सर्व मोबाईल कंपनीचे कॉल ड्रॉप चे प्रमाण वाढल्यानं नागरिक संतापले आहेत. सध्या कोरोनामुळं वर्क फॉर्म होम , कॉन्फरन्स कॉल, मिटिंग, विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. यामध्ये देखील अनेक वेळा नेटवर्क गेल्यानं खंड पडत आहे. यामुळं रोजच्या दिनचर्येत गैरसमज होत असून काही ठिकाणी तर यावरून दुकानदार ग्राहक हातघाईवर आल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले आहे. याबाबत कोणाकडं तक्रार करायची यावर मोबाईल ग्राहक संभ्रवास्थेत आहेत.

बारामती शहर व तालुक्यात सध्या मोबाईल कॉल ड्रॉप मुळं नागरिक हैराण आहेत. यामध्ये फोन न लागणं, नेटवर्क प्रॉब्लेम, फोन कट होणं, वेटिंगवर राहणं ,रेंज नाही, आवाज कट होणं, ४ जी रेंज वरून २ जी रेंजवर गेल्यानं नेटवर्क मिळत नाही. यामध्ये ग्राहकाचे नेट खर्च होते. तसेच पैसे कट होतात, महत्वाचं फोन कट होतात, टॉवरची दुरुस्ती नसल्यानं तर काही ठिकाणी टॉवर बंद आहेत.

असे सूत्रांकडून समजलं, यामुळं ग्राहकांचं आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहक दुकानदाराकडं गेल्यावर वाद होत आहेत. सध्या काही कंपन्यांचे विलगीकरण सूरू असल्यानं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर ग्राहकांनी दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड घेतल्यास त्यावर लोड येऊन नेटवर्क स्लो चालत असल्यानं द्विधा परिस्थिती होत असून यावरून वाद होणे, मुद्दाम करणे असे गैरसमज होत आहेत.

याबाबत ग्रामीण भागातील ग्राहकांची कोणतीही दखल घेतली जात नाही यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं गरजेचं आहे, असं अनेक ग्राहकांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा