नवी दिल्ली, दि. ८ जून २०२०: रविवारी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैसे प्रतिलिटर वाढ झाली. ही वाढ ८२ दिवसानंतर करण्यात आली आहे, कारण पूर्वी तेल कंपन्या दररोज किंमती ठरवत असत. सरकारी तेल कंपनीच्या अधिका-याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, पूर्वी दररोज किंमती निश्चित केल्या जात असत, आता पुन्हा ते सुरू करण्यात आले आहेत. यापूर्वी तेल कंपन्या एटीएफ आणि एलपीजी दर नियमितपणे ठरवत असत पण ते १६ मार्चपासून बंद करण्यात आले. लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली. यावर मात करण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली.
६ मे रोजी सरकारने पेट्रोलवर १० रुपये आणि डिझेलवर १३ रुपये एक्साईज ड्युटी वाढवली. तथापि, संपूर्ण देशातील लॉकडाऊनमुळे खर्चाची समस्या वाढत असल्याने तेल कंपन्यांनी हा भार खरेदीदारांवर टाकला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली त्यानंतर तेल कंपन्यांनी शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. तेल कंपन्यांनी अल्ट्रा क्लीन बीएस-VI इंधनावर ही तीच पद्धत अवलंबिली, ज्यात १ एप्रिल रोजी लिटरमागे १ रुपये वाढ करण्यात आली.
कसे आहेत नवीन दर
पुण्यामध्ये पेट्रोल ७८.६७ रुपये आणि डिझेल ६७.५५ रुपये झाले आहे. मुंबई आणि कोलकाता येथे पेट्रोलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आता मुंबईत ७८.९१ रुपये आणि कोलकातामध्ये ७३,८९ रुपये प्रतिलिटरवर उपलब्ध आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ५३ पैशांच्या वाढीसह ७६.०७ रुपये झाला आहे. मुंबईत डिझेलच्या दरात ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. आता त्याचा दर वाढवून ६८.७९ रुपये करण्यात आला आहे. कोलकातामध्ये डिझेलचे दर ५५ पैशांनी वाढून ६६.१७ रुपये झाले आहेत. चेन्नईत डिझेलचे दर ६८.२२ रुपयांवरून ६८.७४ रुपयांवर गेले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा नवीन दर ७१.८६ रुपये झाला, तर शनिवारी एका लिटरची किंमत ७१.२६ रुपये होती. तर डिझेलची किंमत ६९.३९ रुपयांवरून ६९.९९ रुपये झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी