पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज पुन्हा वाढ

नवी दिल्ली, दि. १८ जून २०२० : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कमजोरी असूनही, देशात पेट्रोल आणि डिझेलची महागाई कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईची प्रक्रिया गुरुवारी सलग १२ व्या दिवशीही कायम राहिली. या आठवड्यातल्या सलग चौथ्या दिवशी म्हणजेच आज देखील पेट्रोल ५३ पैशांनी महागले आहे, तर डिझेलच्या किंमतीत ६४ पैशांची वाढ झाली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ७७.८१ रुपये प्रतिलिटर दराने आले आहे. त्याच वेळी, डिझेलची किंमत प्रतिलिटर ७६.४३ आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सलग १२ दिवसांच्या वाढीनंतर पेट्रोल ६.५५ रुपयांनी महाग झाले आहे आणि डिझेलच्या किंमती ७ रुपयांपेक्षा जास्त वाढल्या आहेत.

देशातील इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबद्दल बोलतांना मुंबईतील पेट्रोल ८४.६६ रुपये तर डिझेल ७४.९३ रुपयांवर विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत ८१.३२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ७४.२३ रुपये आहे. कोलकाताबद्दल बोलताना पेट्रोल ७९.५९ रुपये आणि डिझेलची किंमत ७१.९६ रुपये आहे.

तेल कंपन्यांनी बुधवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमधील पेट्रोलच्या दरात अनुक्रमे ५५ पैसे, ५३ पैसे, ५३ पैसे, ४९ पैसे प्रतिलिटर वाढ केली. त्याचबरोबर चार महानगरांमध्ये डिझेलच्या किंमती अनुक्रमे ६० पैसे, ५४ पैसे, ५७ पैसे आणि ५२ पैशांनी वाढविण्यात आल्या.

जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोललो तर ते प्रति बॅरल ३५ च्या आसपास आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या रविवारीपासून इंधन दरामध्ये दररोज होणाऱ्या बदलांची प्रक्रिया पुन्हा सुरू केली होती. यापूर्वी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे देशातील इंधनाचे दर सलग ८२ दिवस स्थिर राहिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा