‘या’ राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२३ :रविवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड डॉलर ८६.३९ पर्यंत खाली आले आहे. देशातील तेल कंपन्यांनी दररोज सकाळप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे दिसत आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल २६ पैशांनी महागले असून ते ९५.८८ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. त्याचवेळी डिझेलचा दर ८५.१२ रुपये प्रतिलिटर झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ५० पैशांहून अधिक वाढ झाली आहे. आज येथे पेट्रोल १०१.३५ रुपये आणि डिझेल ८६.४४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही इंधनाच्या दरात किंचित वाढ होताना दिसत आहे. पंजाबमध्ये पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त झाले आहे.

  • चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर, मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर, कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोल १३२ रुपये प्रति लिटर व डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

  • दररोज सकाळी ६ वाजता नवीन दर जारी दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा