मार्चमध्ये पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर? सौदी अरेबियाच्या या हालचालीतून मिळाले संकेत

15

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022: सौदी अरामकोने मार्चसाठी आशियामध्ये विकल्या गेलेल्या क्रूड ग्रेडचे दर वाढवले ​​आहेत. कंपनीने सर्व प्रकारच्या क्रूडच्या किमती वाढवल्या आहेत. जगातील प्रमुख तेल निर्यातदारांपैकी एक असलेल्या सौदी अरामकोने फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये आपल्या आशियाई ग्राहकांसाठी अरब लाइट क्रूड ग्रेडची किंमत प्रति बॅरल 60 सेंटने वाढवलीय. हे ओमान/दुबईच्या सरासरीपेक्षा प्रति बॅरल $2.80 च्या प्रीमियमचे प्रतिनिधित्व करते.

याचा अंदाज सर्वेक्षणात आधी वर्तवण्यात आला होता

जानेवारीमध्ये केलेल्या रॉयटर्सच्या सर्वेक्षणात असा अंदाज आहे की कंपनी मार्चमध्ये आपला फ्लॅगशिप ग्रेड 60 सेंट्स प्रति बॅरलने वाढवू शकते. किमतीतील ही वाढ आशियातील मजबूत मागणी दर्शवते आणि यामुळं कंपन्या गॅसोइल आणि जेट इंधनात जास्त मार्जिन ठेवत आहेत.

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात

सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत अधिक अस्थिरता दिसली, तर त्याचा परिणाम भारतातही इंधनाच्या दरावर दिसू शकतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत आहे.

हे आहेत दिल्ली-मुंबईचे कालचे दर

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 02 डिसेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर प्रतिलिटर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रति लिटर इतका आहे.

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, तरीही बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील विविध राज्यांमध्ये पेट्रोलची 100 रुपयांहून अधिक दराने विक्री होत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त आहे. येथे एक लिटर पेट्रोलचा दर 82.96 रुपये आहे. एक लिटर डिझेल भरण्यासाठी 77.13 रुपये मोजावे लागतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे