पेट्रोलमुळे पोलिसांना सापडले होते आरोपी

हैदराबाद : पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोलू शिवा हा घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी केलं. मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपी दोन लीटरची रिकामी बाटली घेऊन पंपावर पोहचला होता. त्याला कर्मचाऱ्याने पेट्रोल देण्यासही नकार दिला होता. त्यानंतर आरोपींनी दुसऱ्या पंपावरून पेट्रोल खरेदी केलं.
पोलिसांनी मुद्दाम आरोपींना मध्यरात्री घटनास्थळी नेलं आणि चकमक घडवून आणली असा आरोप होतोय. पण पोलिसांनी त्याचा खुलासा केलाय. आता आरोपींनी दिशाचा मृतदेह जाळण्यासाठी पेट्रोल खरेदी केले तेव्हाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. प्रकरणाचा तपास करत असताना पेट्रोल पंपावरून पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज मिळाले होते. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिशाच्या मृतदेहाला जाळण्यासाठी आरोपी पेट्रोल खरेदी करत असलेलं दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारेच आरोपींना ताब्यात घेतलं होतं. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपीची ओळख सांगितली होती. दरम्यान, सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिला पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी तिचे हातपाय बांधले. तसंच त्या महिलेला जबरदस्ती दारूही प्यायला लावली. त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडताच तिला पुलाखाली नेण्यात आलं आणि तिथं तिच्या अंगावर पेट्रोल टाकून त्या महिलेला जाळण्यात आलं,’ असे खुलासे आरोपीने पोलीस कोठडीत केल्याचं हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा