पीएफआय च्या टार्गेटवर होते न्यायाधीश आणि पोलीस अधिकारी, ४ टप्प्यात होते प्रशिक्षण

औरंगाबाद, ६ ऑक्टोबर २०२२ : एटीएसने पीएफआय प्रकरणात न्यायालयासमोर मोठा खुलासा केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयच्या निशाण्यावर काही न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे एटीएसने न्यायालयाला सांगितलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यातही लाखो रुपये जमा करण्यात आल्याचे एटीएसने म्हटलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रशिक्षण देण्यात आले असून, जे पीएफआयमध्ये सामील व्हायचे त्यांना पगारही दिला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. म्हणजेच पीएफआयच्या सदस्यांना सर्वतोपरी मदत केली जात होती.

एटीएसने न्यायालयाला सांगितले की, पीएफआयमधून नव्याने भरती झालेल्यांना भरतीनंतर चार टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण देणे, ब्रेन वॉशिंग करणे, कायदेशीर बाबींची माहिती देणे आणि जर कोणी एखाद्या प्रकरणात अडकले तर त्याला सर्वोच्च न्यायालयात मोठा वकील मिळणे. पीएफआय ही योजना अगोदर तयार ठेवत असे.

प्रशिक्षणाचे चार टप्पे कोणते?

टप्पा-१

कोणताही नवीन सदस्य जोडण्यापूर्वी त्याचे ४ महिने निरीक्षण करण्यात आले. त्या सदस्याच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती काढण्यात आली, अशा २० लोकांपैकी फक्त २ लोकांना सदस्य बनवण्यात आले.

टप्पा-२

ज्या दोघांना सभासद बनवण्यात आले त्यांना ६ महिन्यांत स्वतःला सिद्ध करायचे होते. हे लोक आपल्या धर्मासाठी किती कट्टर आहेत, याची चाचपणी झाली. सोशल मीडियावर वादग्रस्त संदेश लिहिण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. पोलिसांची दिशाभूल कशी करायची याचेही प्रशिक्षण देण्यात आले.

टप्पा-३

महाराष्ट्र आणि केरळमध्ये तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. कायमस्वरूपी सहभागी झालेल्या सदस्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. सदस्यांना त्यांची घरे आणि कुटुंबे सोडून द्यावी लागली. त्या बदल्यात त्याला पैशांशिवाय आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळायच्या. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या घराचा खर्चही देण्यात आला.

टप्पा-४

सदस्यांना आंतरराष्ट्रीय दुवे तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय लिंक तयार करून निधी जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली. स्टेज फोरच्या सदस्यांना कोणत्याही दहशतवादी कटात मदत करण्याबाबतही माहिती देण्यात आली. एटीएसने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार केवळ पाच टक्के सदस्य स्टेज-३ पर्यंत पोहोचू शकले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा