फलटण शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, फलटण राष्ट्रीय काँग्रेस चे नगरपालिकेला निवेदन

फलटण, सातारा १८ जुलै २०२३ : फलटण शहरात सध्या मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असुन त्याचा उपद्रव होत आहे. त्याचा त्रास फलटण कर जनतेला होतोय. फलटणमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन फलटण राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले. या समस्यांबाबतीत तातडीने उपाय योजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

फलटण नगरपालिका हद्दीत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, काही ठिकाणी स्वच्छता, साफसफाई ची कामे वेळेवर झाली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यात मच्छर वाढले आहेत त्यामुळे आजारपणात वाढ झाली आहे त्यासाठी स्वच्छता अभियान चालू करून फवारणी करावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस फलटण च्या वतीने नगरपरिषद च्याउपमुख्याधिकारी श्रीमती वर्षा बडदरे,कार्यालय अधिक्षक श्री. मुस्ताक महात यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी नगरपरिषद अधिकाऱ्यांना निवेदन देतांना फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्र सुर्यवंशी (बेडके), शहर काँग्रेस चे अध्यक्ष श्री.पंकज पवार, तालुका कार्याध्यक्ष श्री.अमिरभाई शेख, जिल्हा अनूसुचित जाती सेलचे उपाध्यक्ष श्री.सिद्धार्थ दैठणकर, अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष श्री.ताजुद्दिन बागवान, शहर अध्यक्ष श्री.अल्ताफभाई पठाण उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा