लूटमार करणाऱ्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

फलटण, सातारा २१ ऑक्टोबर २०२३ : फलटण पुसेगाव या प्रमुख मार्गावर असणाऱ्या ताथवडा घाटात लूटमार करणाऱ्या टोळीला, फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. पाच आरोपींकडुन कडून तब्बल २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण येथील कुरिअर बॉयची मानेवाडी गावाध्ये लूट केली होती. संबंधित आरोपींनी आमचे पार्सल आहे का असे बळजबरीने विचारत, कुरिअर बॉय कडे असणारे मोबाईल, रोख रक्कम व पार्सल असा एकूण ५२००० चा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेली होती.

याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनलाकरण्यात आलेली. त्यानंतर तपासाची सूत्रे गतीने फिरवण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ने कसून तपास केला असता, अजय संभाजी मदने वय २१ मु. पो. डीस्कळ ता. खटाव जिल्हा सातारा, अक्षय संभाजी जाधव वय २७, मोळ ता. खटाव जिल्हा सातारा, निखिल उमाजी बुधावले वय २१ बुधावलेवाडी ता. खटाव जिल्हा सातारा, आदित्य रामचंद्र शिरतोडे वय १९ ललगुण ता. खटाव जिल्हा सातारा, आकाश प्रभाकर जाधव वय २२कोरेगाव, तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या आरोपींचा माग लागला. त्यांना पोलीस खाक्या दाखवत त्यांच्याकडून दोन मोटरसायकल सह एकूण २ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाखरी, तालुका फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरील कामगारालाही याच गुन्ह्यातील आरोपींपैकी, अजय संभाजी मदने व निखिल उमाजी बुधावले यांनी तलवारीचा धाक दाखवून रोकड लंपास केली होती. ताथवडा घाटामध्येही या टोळीने लुटमारीचे प्रकार केले होते. आरोपींना फलटण न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

सदरची कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनेनुसार, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे, प्रमोद दीक्षित, पाटील साहेब, पोलीस अंमलदार योगेश रणपिसे, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार व तुषार नलावडे यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा