फलटण, २० जानेवारी २०२३ : नुकत्याच केपटाऊन येथे सुरू असलेल्या नेशन कप हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी उत्कृष्ट होत आहे. दक्षिण आफ्रिका व आयर्लंड या संघांवर दणदणीत विजय मिळविला. त्यामध्ये फलटणच्या वैष्णवी फाळके हिने पदार्पणातच गोल नोंदविले.
फलटण तालुक्यातील आसू येथील शेतकरी कुटुंबातील वैष्णवी विठ्ठल फाळके हिने भारतीय ज्युनिअर हॉकी महिला संघात चमकदार कामगिरी केली होती. त्याची दखल घेत तिची नुकतीच भारतीय हॉकी संघात निवड करण्यात आली. आपली निवड सार्थकी लावत पहिल्याच सामन्यात २२व्या मिनटात वैष्णवी हिने दुसरा गोल नोंदविला. याबद्दल तिचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाची विजयी घडदौड सुरू असून, महिला भारतीय हॉकी संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ७-० ने पराभव केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार











































