फिलिपआईन्स : विद्यार्थ्यांनी घातली चित्रविचित्र स्वरूपाची हेल्मेट ?

फिलिपआईन्स,२५ ऑक्टोबर २०२२: सोशल मीडिया बरेच व्हिडिओ, फोटो वायरल होत असतात त्यातील अनेक व्हिडिओंमध्ये प्राण्यांच्या ऍक्टिव्हिटी असतात, तर कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाते. असाच एक फोटो त्यातील चित्रविचित्र कंटेंटमुळे चर्चेचा विषय बनला आहे.

https://www.facebook.com/100004705509375/posts/pfbid0zQR99wsgV6iJ9tJ6hCod8KqTs9bVAfhv26DggBZXMNG4wpe7U57asVEKMcFnK5C9l/

व्हिडिओमध्ये वर्गात विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि त्यावेळी त्यांनी चित्रविचित्र स्वरूपाची हेल्मेट घातली आहे. ही मुले कुठच्या रस्त्यावर गाड्या चालवत नाहीत किंवा कुठे मारहाणीच्या ठिकाणी उभी नाहीत, तरीही यांनी हेल्मेट का घातले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मागील कारण जाणून घेण्यासाठी अनेक जण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहे.

हे नेमके कुठले आहे?

हा हटके व्हिडिओ/ फोटो पाहिल्यानंतर हे विद्यार्थी नेमके आहेत तरी कुठले असा प्रश्न अनेकांना पडत आहे त्यामुळे लोक गुगलवर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा सर्च करीत आहे. हा व्हिडिओ फिलिपआईन्समधून वायरल झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

प्रसारित झालेल्या बातमीनुसार, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर घातलेली चित्र विचित्र हेल्मेट्स हे कागद आणि खराब वस्तूंपासून बनवण्यात आली आहे. त्यामुळे हेल्मेट चित्र विचित्र असतील तरी विद्यार्थ्यांनी याची निर्मिती करण्यासाठी केलेला टाकाऊ वस्तूंचा वापर कौतुकास पात्र ठरला आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःचे हेल्मेट बनवले आहे. हेल्मेटची डिझाईन सर्वांचीच वाहवा मिळवत आहे.

बनवली अँटी चॅटिंग हॅट !

कॉलेज विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये वापरलेले हेल्मेट हे अँटी चॅटिंग असल्याचे समोर आले आहे. बायकल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधील हा व्हिडिओ आहे. यातील विद्यार्थी इंजीनियरिंगचे स्टुडंट्स आहेत. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, म्हणून अशा प्रकारचे हेल्मेट घालण्याच्या सूचना परीक्षा विभागाने दिल्या होत्या.

त्यानुसार परीक्षा केंद्रामध्ये इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर चित्र विचित्र हेल्मेट्स घातली होती. परीक्षेतील कॉफीचा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा प्रशासनाने केलेला हा उपाय चांगला चर्चेत आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा