फोन भूत’ ट्रेलर

पुणे, १० ऑक्टोंबर २०२२: बॉलिवूड साठी हे वर्ष काही खास जात नव्हतं. खूप सिनेमे फ्लॉप जात होते. त्यातच बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड सुरू होता. येणारे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरत नव्हते.

हे सुरू असतानाच आपले मनोरंजन करण्यासाठी लवकरच “फोन भूत” हा सिनेमा येतोय. कतरीना कैफ, सिद्धार्थ चतुर्वेदी, ईशान असलेल्या या सिनेमाचा आज ट्रेलर लाँच करण्यात आला. हॉरर कॉमेडी असे मिश्रण असणारा हा सिनेमा ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. भुताला एक पात्र म्हणून दाखवणारा हा काही पहिलाच चित्रपट नाही.

भूत हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे ओबडधोबड तोंड, रागीट डोळे, विखुरलेले केस असणारी व्यक्ती. पण “फोन भूत” यातलं भूत हे खूप गोंडस अणि सुंदर असणार आहे असं बोलायला हरकत नाही. कारण हे पात्र साकारल आहे, कतरीना कैफ हिने. सिद्धार्थ अणि ईशान यांना भूत दिसत असतात. आणि त्यांचं ध्येय हे भूतांना मोक्ष प्राप्त करून देण्याचं असतं.

पण जेव्हा आत्माराम यांच्या आयुष्यात येतो तेव्हा नवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं. कतरीना ही या दोघांकडे एक बिझनेस प्लॅन घेऊन येते. ह्या दोघांच्या मदतीने तिला जॅकी श्रॉफ (आत्माराम) याच्या वाईट कामांना थांबवायचं असतं.

या ट्रेलर मधला सर्वात मजेदार किस्सा म्हणजे शिबा चढ्ढा (एक भटकी आत्मा), तिला ‘मोक्ष’ हा शब्द उच्चारता येत नसतो. अणि कतरिना विचारते की “तुम्हारी हिंदी विक है?” असं. प्रेक्षकांनी या डियालॉग ला फार पसंती दिली. शिबा सुद्धा यात एक भुताचे पात्र साकारतेय. लग्नानंतर ही कतरिना ची पहिलीच फिल्म असल्याने हिची चर्चा रंगलीय. प्रेक्षक खूप उत्साहित आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा