राज्यमंत्री बनले फोटोग्राफर …..

इंदापूर, १५ डिसेंबर २०२०: सोमवारी सायंकाळी विधिमंडळाचं कामकाज आटोपल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या सहकाऱ्यांसमवेत फेरफटका मारत होते. त्यावेळी तिथं असणाऱ्या लहान मुलांनी दत्तात्रय भरणे यांच्या टोपण नावानं मामा अशी हाक मारत आमचा एक फोटो काढता का प्लीज, अशी विनंती केली.

मंत्री म्हटलं की, सुरक्षारक्षकांचा लवाजमा त्यांच्यासमवेत ठरलेला असतो. परंतु, त्याला अपवाद असंल सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे. मुलांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तातडीनं त्यांच्या मोबाईल फोनमध्ये त्या मुलांचा ग्रुप फोटो काढला. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. परंतु, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे त्या मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो त्यांच्या सहकारी आमदाराने काढला.

अगदी साधेपणाचं उदाहरण असलेल्या दत्तात्रय भरणे हे लहान मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अगदी साधेपणाचं उदाहरण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आचरणातून दिसून येत असल्याचं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा