इराणने बोगद्यांमध्ये लपवले हल्ला करणारे ड्रोन, फोटो आले समोर

5

इराण, 29 मे 2022: इराणच्या सरकारी टीव्हीने आज, 28 मे 2022 रोजी एक बातमी प्रसारित केली, ज्यामध्ये काही बोगद्यांमध्ये क्षेपणास्त्रांनी सुसज्ज ड्रोन दाखवण्यात आले होते. झाग्रोस पर्वताखाली बांधलेल्या या बोगद्यांमध्ये इराणी लष्कराचे धोकादायक ड्रोन ठेवण्यात आले आहेत.

इराणचे लष्कर आपले लष्करी सामर्थ्य दाखवण्यासाठी राज्य माध्यम संस्थेच्या माध्यमातून ही छायाचित्रे प्रसारित करत होते. इराणच्या लष्कराने या अंडरग्राउंड ड्रोन तळाविषयी काही माहिती शेअर केली पण नेमके ठिकाण कोणाला कळवले नाही.

या बोगद्यांमध्ये किमान 100 लष्करी ड्रोन ठेवण्यात आले आहेत. चित्र पाहून आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. राज्य माध्यम संस्थेने सांगितले की, जाग्रोस पर्वताखाली बांधलेल्या या बोगद्यांमध्ये धोकादायक अबाबिल-5 ड्रोन देखील आहेत. ज्यामध्ये Qaem-5 क्षेपणास्त्रे बसवली आहेत.

Qaem-5 ही क्षेपणास्त्रे इराणने विकसित केलेली हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. जे अमेरिकेच्या हेलफायर मिसाईलसारखे धोकादायक आहेत. इराणच्या लष्कराचे कमांडर मेजर जनरल अब्दुलरहीम मौसावी यांनी सांगितले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सैन्य हे या भागातील सर्वात मजबूत सैन्य आहे.

द जेरुसलेम पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेजर जनरल म्हणाले की, आमचे ड्रोन कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी पुरेसे आहेत. आम्ही आमचे ड्रोन सतत अपग्रेड करत आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा