पाटणा, ८ मार्च २०२३ : बिहारमधील पाटणा येथील फुलवारी शरीफ दहशतवादी प्रकरणात ‘एनआयए’ने मोठी कारवाई केली आहे. ‘एनआयए’ने याप्रकरणी पाच ऑपरेटर्सना अटक केली असून, मोठा हवाला मॉड्यूल उघडकीस आणला आहे. मोहम्मद सिनान, सरफराज नवाज, इक्बाल, अब्दुल रफिक एम. आणि आबिद के. एम. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ‘पीएफआय’प्रकरणी ‘एनआयए’ने ही कारवाई केली आहे. ‘एनआयए’ने केरळ आणि कर्नाटकमधून ही अटक केली आहे. पाच हवाला ऑपरेटर्सना अटक केल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे की, या अटकांमुळे, बिहार आणि कर्नाटकमधून कार्यरत ‘पीएफआय’च्या हवाला फंडिंग मॉड्यूलचा भंडाफोड झाला आहे. या मॉड्यूलची मुळे संयुक्त अरब अमिरातीशीही जोडलेली असल्याचा दावाही ‘एनआयए’ने केला आहे.
यासोबतच ‘एनआयए’ने असेही सांगितले आहे की, त्यांच्याकडून पकडलेले आरोपी हवालाद्वारे मिळालेला निधी पीएफआय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाटायचे. ते बेकायदेशीररीत्या जमा केलेले पैसे हस्तांतरित आणि चॅनलाइज करायचे आणि ‘पीएफआय’चे कटकारस्थान अमलात आणण्यासाठी खर्च करायचे.
वास्तविक, फुलवारी शरीफ दहशतवादी प्रकरणाच्या तपासासंदर्भात एनआयए केरळ-कर्नाटक आणि बिहारमध्ये हस्तांतरित केलेल्या पैशाची चौकशी करीत होती. दरम्यान, दक्षिण भारतातील हवाला व्यापार्यांचे मोठे नेटवर्क आणि त्यांना कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पथक मोहम्मद सरफराज नवाज आणि मोहम्मद सिनान यांच्यापर्यंत पोचले तेव्हा असे आढळून आले की, दोघेही पीएफआय प्रकरणातील आरोपी आणि संशयितांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करीत आहेत.
फुलवारी शरीफ दहशतवादी मॉड्यूल जुलै २०२२ मध्ये उघडकीस आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा दौऱ्यापूर्वी पाटणा पोलिसांनी फुलवारी शरीफ येथून दोघांना अटक केली होती. त्यानंतर पाटणा पोलिसांनी निवृत्त निरीक्षक मोहम्मद जलालुद्दीन आणि अतहर परवेझ यांना अटक केली. त्यानंतर ११ जुलैला संध्याकाळी पोलिसांनी त्याला आयबीच्या इनपुटवरून अटक केली. १२ जुलैला पीएमची धावपळ संपल्यानंतर पोलिसांनी १३ जुलैला त्याला समोर आणले. त्यानंतर तो उघडकीस आला आहे. पाटणा येथील पीएफआय कार्यालयात दहशतवादी प्रशिक्षण घेणे, कॅम्प चालवणे. यानंतरच भारताला मुस्लिम राष्ट्र बनविण्याचा ‘पीएफआय’च्या मिशन २०४७ चा भव्य कट उघड झाला. नंतर हे प्रकरण ‘एनआयए’कडे सोपविण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड