महाराष्ट्र राजकारणातील महावृक्षचे चित्र भिंतीवर

पुणे, ९ डिसेंबर २०२०: महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार. महाराष्ट्राचं राजकारण तो पर्यंत पुर्ण होत नाही जो पर्यंत शरद पवार यांचं नाव घेतलं जात नाही. अगदी सुरुवाती पासून राजकारणात सक्रीय होऊन तरूण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची ख्याती आहे. तर उभ्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि जनता ही मा. शरदचंद्रजी पवार यांच्यावर प्रेम करतात.

पुण्यातील नारायण पेठेत रमणबाग चौक येथे नगरसेवक मा. दीपक मानकर यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांची सुंदर अशी कलाकृती अर्थात भिंतीचित्र साकारण्यात आलं आहे. जे अल्पवधितच संपूर्ण महाराष्ट्र भर पोहचलं असून नगरसेवक दीपक मानकर यांचं कौतुक केलं जात आहे.

शरद पवार यांचं हे सुंदर भिंतीचित्र कलाकार नीलेश आर्टिस्ट यांच्या कडून काढण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातील निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी वयाच्या विचार न करता अनेक सभा, रॅली, भाषणं केली. कोल्हापूर मधे भर पावसात त्यांनी भिजत भाषण केलं आणि ते कार्यकर्त्यांनी ही पुर्ण पणे ऐकलं होतं ज्यामुळं निवडणूकीच्या निकालावर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा