मुंबई, २९ नोव्हेंबर २०२०: महाराष्ट्रातील राजकरण हे सध्या फार वाईट प्रमाणे होत आसून सत्तेवर आसलेले पक्ष आणि विरोधक यांच्यात नेहमीच जुंपलेली आसते. पण, भाजप मधील काही नेते हे इतक्या खालच्या थराला जाऊन टिका करत असतात. ज्यावरून ते खरचं काय बोलतायत याचे भान ही त्यांना नसते.
नारायण राणे यांचे राजकारणात सक्रीय आसलेले पुत्र भाजप नेते निलेश राणेंनी राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खालच्या थरावर जाऊन टिका केली आहे.
“डुक्कर सत्तार अब्दुल, कॅबिनेट मंत्री पदासाठी काँग्रेसमधून झाला गुल, शिवसनेने राज्य मंत्रीपद देऊन केला एप्रिल फुल, अब्दुल तुझी लायकी किती आणि बोलतो किती. राणे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही. तुझ्यासारखे आमची गाडी धुतात अवकातीत रहा”.
असं ट्विट करून निलेश राणेंणी म्हटलं आहे. त्यांच्या अश्या या वक्तव्याने निलेश राणे यांनी विचार केला कि नाही हे त्यांनाच माहित पण एक राजकीय व्यक्ती म्हणून आपण काय भाष्य करतोय हे बहुतेक ते विसरले पण, आता त्यांच्या या ट्विटवर अब्दुल सत्तार यांची आजून काही प्रतिक्रिया आली नाही.
महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्याने पक्षातील अनेक नेते हे महाविकास आघाडीची सत्ता आल्या पासूनच नेहमीच कडवट विरोध करताना दिसतायत. ज्या मुळे भाजप पक्षाची प्रतिमा महाराष्ट्रात मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे महाराष्ट्रातील भाजप पक्षाची तक्रार केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव