विमान हवेत असताच पायलटचा बाथरूममध्ये मृत्यू, प्रवाशांचा जीव मुठीत

पुणे, १७ ऑगस्ट २०२३ : आकाशात उड्डाण घेल्यानंतर काही तासात विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. २७१ प्रवाशांसह मियामीहून चिलीला जाणाऱ्या व्यावसायिक विमानाच्या बाथरूममध्ये पडल्याने पायलटचा मृत्यू झाला. यामुळे रविवारी रात्री पनामामध्ये विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सहवैमानिकाने हे लँडिंग केले. लॅटम एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर तीन तासानंतर ही घटना घडली. बाथरुममध्ये पडल्याने वैमानिकाचा मृत्यू झाला. या पायलटचे नाव कॅप्टन इव्हान अंदौर असे आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने क्रूने त्यांना आपत्कालीन उपचार दिले परंतु ते त्यांना वाचवू शकले नाहीत.

हे विमान पनामा सिटीच्या टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. वैद्यकीय तज्ञ वैमानिकाचे प्राण वाचवण्यासाठी धावले पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. अंदौर यांना २५ वर्षांचा अनुभव होता. लॅटम एअरलाइन्स ग्रुपने आपल्या निवेदनात म्हटले की, मियामी-सॅंटियागो मार्गावर असलेल्या फ्लाइट एलए ५०५ वैद्यकीय आणीबाणीमुळे पनामामधील टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. विमान उतरले तेव्हा,आपत्कालीन सेवांनी जीवन वाचवणारी मदत दिली, परंतु पायलटचे दुर्दैवाने निधन झाले.

या घटनेमुळे लॅटम एअरलाइन्स ग्रुपने सांगितले की, जे घडले त्यामुळे आम्ही खूप दु:खी असून कॅप्टन इव्हान अंदौर यांच्या बद्दल आम्ही मनापासून शोक व्यक्त करत आहोत. त्यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा