गोल पोस्ट महाराष्ट्र पिंपरी चिंचवडमध्ये ‘WhatsApp Parking’ मुळे वाहन पार्किंग आता होणार सोपे!

पिंपरी चिंचवडमध्ये ‘WhatsApp Parking’ मुळे वाहन पार्किंग आता होणार सोपे!

Pimpri Chinchwad Launches WhatsApp Parking App
वाहन पार्किंग आता होणार सोपे;

Pimpri Chinchwad Launches WhatsApp Parking App: पिंपरी चिंचवडकरांसाठी एक आनंदाची बातमी! आता वाहन पार्किंग शोधणे आणि बुक करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नुकतेच ‘Pay and Park‘ आणि ‘WhatsApp Parking‘ या दोन अभिनव डिजिटल सेवांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या नव्या सुविधांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापनात क्रांती घडणार असून, नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.

WhatsApp Parking‘ ही सुविधा विशेषतः उद्योगनगरीतील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. या सुविधेमुळे आता नागरिक आपल्या स्मार्टफोनवरील WhatsApp वापरून थेट पार्किंगची जागा आरक्षित करू शकतील. यामुळे पार्किंग शोधण्यासाठी लागणारा वेळ आणि मनस्ताप टळणार आहे. विशेष म्हणजे, जर तुम्ही बुक केलेल्या वेळेत वाहन पार्क केले नाही, तर तुम्हाला तात्काळ सूचना (Smart Alert) मिळेल आणि ती जागा इतरांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे वेळेचे योग्य नियोजन साधता येणार आहे.

या डिजिटल पुढाकारामुळे कागदपत्रांची गरज पूर्णपणे संपुष्टात आली आहे. पार्किंग बुकिंगचे स्टेटस आणि रिअल-टाईम माहिती थेट तुमच्या WhatsApp वर उपलब्ध होईल. सध्या, पिंपरी चिंचवड शहरातील दहा प्रमुख ठिकाणी ही अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना तत्काळ लाभ घेता येईल. या तांत्रिक प्रगतीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल आणि शहराला अधिक स्मार्ट बनवण्यात मदत होईल.

दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीने इतर महत्त्वाच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली आहे, ज्यात दिव्यांग नागरिकांचे घरपोच सर्वेक्षण करून सामाजिक व आर्थिक जीवनमापन (Mapping), चिंचवडमधील नाल्यांच्या दुरुस्तीची कामे, महापालिकेच्या रस्ते, उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपणासाठी रोपे पुरवठा, आणि स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत मोशी कचरा डेपोतील जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग यांसारख्या कामांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version