पिंपरी चिंचवड महापलिकेचा भोंगळ कारभार

4

पिंपरी चिंचवड, १९ ऑगस्ट २०२०: राज्यात कोरोनाचा कहर चालू असताना भ्रष्टाचार मात्र थांबायचे नाव घेत नाही. गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील विविध शहरांमधे कोरोनाच्या या परिस्थितीत अनेक गोष्टींचा भांडाफोड होताना दिसले आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने कोरोनाच्या नावाखाली सुरू केलेली कोट्यवधींची उधळपट्टी थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही.

भांडार कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता वादग्रस्त ठरलेल्या स्मिथ मेडिकल इंडिया या कंपनीच्या पुण्यातील एका विक्रेत्याकडून साडेतीन कोटींहून अधिक रुपयांची थेट खरेदी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक लाख रुपयांना मिळणारे उपकरण थेट पद्धतीने अडीच लाखांना घेत भांडार विभागाने कहरच केल्याचे समोर आले आहे.

मोजक्या ठेकेदारांचे हितसंबंध….

भांडार विभागातील काही मोजक्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या ठराविक ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंधच या खरेदीला कारण असल्याचे बोलले जात आहे. एक ते दीड कोटी रुपयांच्या उपकरणासाठी तब्बल ३ कोटी ६४ लाख मोजण्यात येणार असल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून कर रुपाने गोळा झालेल्या दोन कोटी रुपयांची उधळपट्टी स्व: स्वार्थासाठी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा