पिंपरी-चिंचवड, ५ फेब्रुवारी २०२५: पिंपरी-चिंचवड नगर निगमकडून (PCMC) ४३ मालमत्तांचा दोन वेळा लिलाव करण्यात आला होता, परंतु त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ज्या संपत्तीमालकांनी १ लाख रुपयांपेक्षा जास्त कर थकवला आहे, त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला. यामध्ये १ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थकवलेल्या ३ निवासी आणि २० व्यापारी मालमत्तांचा समावेश आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, कासारवाडी या भागांतील मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता.
पहिल्या दोन लिलावांमध्ये कोणत्याही मालमत्ताधारकांनी, तसेच कोणत्याही खरेदीदारांनी प्रतिसाद देण्याचे टाळले. ३१ जानेवारीपर्यंत असलेली अंतिम मुदत संपल्यानंतरही कसलीच नोंदणी झाली नाही. त्यामुळे नगर निगम आता तिसऱ्या लिलावाची तयारी करत आहे. जर तिसर्या लिलावालाही मालमत्ताधारकांचा प्रतिसा्द मिळाला नाही, तर त्या मालमत्ता नगर निगमच्या ताब्यात जातील. तसेच या मालमत्ता नाममात्र किमतीत विकल्या जातील, अशी माहिती असिस्टंट कमिशनर अविनाश शिंदे यांनी दिली.
जर तिसऱ्या लिलावालादेखील खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला नाही, तर पिंपरी-चिंचवडमधील संपत्तीच्या या लिलावाला एक मोठे वळण मिळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे