साताऱ्यात खास महिलांसाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा, पैसे कमवा’ योजना

सातारा ११ ऑगस्ट २०२४ : वृक्ष चळवळ वाढीस लागावी आणि गावे पुन्हा हिरवीगार व्हावीत यासाठी सातारा पंचायत समितीच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे शाळा अंगणवाडी गावाची सार्वजनिक जागा किंवा कोणतेही शासकीय जागेवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे झाडे लावा झाडे जगवा आणि पैसे कमवा असे या उपक्रमाला नाव देण्यात आले असून यामध्ये सातारा तालुक्यातील चाळीस गावांना सहभागी होता येणार आहे आत्तापर्यंत 36 गावांनी या योजनेसाठी सहभाग घेतला आहे. गटविकास अधिकारी सातारा पंचायत समिती सतीश बुद्धे यांनी याबाबत माहिती दिलीय.

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार गेले अनेक वर्ष वृक्ष लागवडी साठी विशेष प्रयत्न करत आहेत. सातारा पंचायत समिती सातारा यांच्या माध्यमातून सध्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये झाडे लावा झाडे जगवा आणि पैसे कमवा असा एक नावीन्यपूर्ण उपक्रम सध्या पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत गावांना २५० झाडे देण्यात येणार आहेत. ही झाडे आपल्या परिसरात चांगली वाढणारी आणि स्थानिक प्रजातींचे रक्षण करणारी ही झाडे असतील. त्यासाठी गावातील उमेद बचत गटांतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून हा रोजगार उपलब्ध होणार असून महिन्याला झाडांच्या देखभालीसाठी किमान नऊ हजार रुपये एका बचत गटाला मिळणार आहे. झाडाचे संगोपन करणे, पाणी देणे, गवत काढणे, झाडांना ट्री गार्ड लावणे अशी कामे या झाडांचे संगोपन करताना करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारची महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत प्रतिदिन एका महिलेला २९७ रुपये मजुरी या प्रकल्प अंतर्गत देण्यात येणार आहे. अशी एक महिला एक आठवडा काम करणार आणि त्या आठवड्याचं पंधरा दिवसात २०७९ रुपये या महिलेच्या अकाउंट मध्ये येणार. ३३ गावात वृक्षारोपण लागवड करण्यात येत असून यापैकी ६ गावात ५०० पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आले आहे. यासाठी १५६ महिलांना रोजगार देण्यात आला असून या रोजगाराच्या माध्यमातून २०७९ त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सातारा तालुक्यात एकूण १० हजार पेक्षा जास्त प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आल आहे. महिलांना अनेकदा रोजगारासाठी बाहेरगावी जावे लागते. ते सोयीस्कर नसल्याने आणि अधिक वेळ वाया जात असल्याने मनरेगाच्या माध्यमातून जॉब कार्ड असलेल्या महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होणार

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा