विकासार्थ विद्यार्थ्यांकडून एनडीए टेकडीवर दोन हजार वृक्षांची लागवड

पुणे: २६ जूलै २०२२: महाराष्ट्र शासन वनविभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विकासार्थ विद्यार्थी (एस एफ डी) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन डी ए) च्या टेकडी वर एक कोटी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन अभियाना अंतर्गत दोन हजार वृक्ष लागवड करण्यात आली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एकमेव विद्यार्थी संघटना आहे जी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविते, गरज पडल्यास आंदोलनही करते पण त्याच बरोबर राष्ट्राच्या विकासासाठी विधायक कार्य सुद्धा करते. आज प्रत्यक्षात या वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन या अभियानात सहभागी होता आले याचा मनस्वी आनंद होतो आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी केले.

या अभियानात ७७५ वृक्ष मित्रांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. यामध्ये मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान व विधी महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पर्यावरण विषयात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे निर्माण व्हावी, पर्यावरणा प्रती विद्यार्थ्यांमध्ये प्रेम वाढावे, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन पर्यावरण संरक्षण करण्यास हातभार लावावा, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

यावेळी, महेश ठाकूर, अभाविप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शरद गोस्वामी, प्रा. संतोष परचुरे, प्रा. वऱ्हाडे, विकासार्थ विद्यार्थी प्रदेश संयोजक प्रसाद आठवले यांचेसह वृक्षमित्र विद्यार्थी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी :

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा