कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे एक हजार झाडांचे वृक्षारोपण

4

कर्जत, दि. २४ जुलै २०२०: कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे पावसाळ्याच्या सुरुवातीला संपुर्ण गावात एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जलालपूर हे गाव भीमा नदीच्या काठी असलेले बागायत पट्ट्यातील अतिशय महत्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. दर वर्षी जलालपूर ग्रामपंचायत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येत असतो. या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचायतीने नदी परिसर, सज्जन घाट, मारूती मंदिर मागील दोन एकर परिसरात, तसेच नदी शेजारील काठांवर देखील वृक्षारोपण करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीने वृक्षारोपण करताना अत्यंत काळजीपूर्वक झाडांची निवड देखील केल्याचे पाहण्यास मिळत आहे. या मध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, लिंब, चिंच, आवळा, बांबू, नादरूक, शिसव अशा महत्वाच्या औषधी वनस्पती आणि निसर्गाला पोषक असणा-या वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.

वृक्षारोपण करते वेळी जलालपूर ग्रामपंचायतीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक श्याम भोसले, माजी सरपंच किसन कासारे, ग्रामपंचायत सदस्य मोतीराम कासारे, बापू कांबळे, बापू खुरंगे, तुकाराम लष्कर, ग्रामपंचायतीचे लेखनिक रघुनाथ ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा