ठाणे, दि. ६ ऑगस्ट २०२०: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी काल दि. ५ ऑगस्टला प्लाझ्मा दान केले. ठाण्यातल्या ब्लड लाईन रक्तपेढीत त्यांनी प्लाझ्मा दान केले. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील प्लाझ्मा दान केले.
देशात कोरोना बाधितांची संख्या १९ लाखांच्या पार गेली असून राज्यातही साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी जातात. मात्र वयस्कर लोक, रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेले आणि अन्य आजार असेलेले कोरोनाबाधित लोक यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागते. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील प्लाझ्मा हा कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचारासाठी परिणामकारक ठरतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन डॉक्टर आणि सरकारने केले आहे.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड हे कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे त्यांनीही काल दि. ५ ऑगस्टला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्लाझा दाना करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतरांनाही प्लाझ्मा दान करावे असं आवाहन त्यांनी केलं आहे.