कोल्हापूर येथे ‘सीपीआर’मध्ये आता होणार प्लास्टिक सर्जरी

कोल्हापुर, ९ फेब्रुवारी २०२३ : गोरगरिबांचा आधारवड असलेल्या ‘सीपीआर’मध्ये आता प्लास्टिक सर्जरीचीही सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे आता प्रथमच ‘सीपीआर’मध्ये प्लास्टिक सर्जरी होऊ लागल्या आहेत. याचा फायदा कोल्हापूरसह कोकण, कर्नाटकातील अनेक रुग्णांना होणार आहे. प्लास्टिक सर्जन डॉ. प्रशांत चौधरी यांची ‘सीपीआर’मध्ये महिनाभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे‌.

यानंतर गेल्या महिन्यात बारा प्लास्टिक सर्जरी ‘सीपीआर’मध्ये झाल्या आहेत. यामुळे प्लास्टिक सर्जरीशी संबंधित महागडे उपचार घेण्याची वेळ आता रुग्णांवर येणार नाही. मारामारी आदींसह भाजलेले रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा रुग्णांना तुटलेला अवयव, त्वचा जोडण्यासाठी प्लास्टिक सर्जन उपलब्ध नव्हता. यामुळे अशा रुग्णांना अनेकदा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता.

आता ही सर्व सुविधा ‘सीपीआर’मध्येही उपलब्ध होणार आहे. भाजलेले रुग्ण, मान, हात चिकटलेले रुग्ण, कुष्ठरुग्णांची वाकडी झालेली बोटे, तुटलेले हात, कान, त्वचा गेल्याने बाहेर दिसणारे हाड, जन्मजात बाळामध्ये असलेले दोष आदी अनेक प्रकारांसह सौंदर्याच्या दृष्टीने चेहऱ्याची सर्जरी आता ‘सीपीआर’मध्ये होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा