राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत फलटणच्या मुधोजी हायस्कूलचे खेळाडू चमकले

फलटण (जिस. सातारा), ४ मार्च २०२३ : ता. ११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र ॲमॅच्युअर किक बाॅक्सिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजमधील मुलींची निवड झाली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी देदीप्यमान असे यश संपादन करून सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकावरती आपले नाव कोरले.

या स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या अंजली रोमण, जान्हवी मर्दाने, अनिषा शिंदे, रितू कहार, धनश्री तेली यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर गीतांजली बंडगरने रौप्यपदक, कादंबरी मोरेने कांस्यपदक प्राप्त केले. वरील सर्व खेळाडूंना प्रशालेतील कला शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक सतीश नाळे यांनी मार्गदर्शन केले.

राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधीक्षक श्री. श्रीकांत फडतरे, मुधोजी हायस्कूलचे स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य; तसेच मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी. एम. गंगवणे, उपप्राचार्य ए. वाय. ननवरे, जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एम. के. फडतरे, पर्यवेक्षक शिवाजीराव काळे व क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा