पुणे, औंध दि. २९ एप्रिल २०२०: पुण्यामध्ये औंध येथील एम्स हॉस्पिटलमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण वयस्कर होता आणि त्यामध्ये लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली होती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली होती त्यानंतर त्याची टेस्ट घेण्यात आली. रात्री ११.३० च्या दरम्यान संबंधित व्यक्तीस पिंपरी-चिंचवडमधील वाय सी एम रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते.
दरम्यान एम्स मधील संपर्कात आलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे औंध भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातील काही कर्मचारी हे औंध मधील रहिवासी होते. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण तयार झाले होते. मात्र आज (२९ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता क्वारंटाईन केलेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
या दिलासादायक बातमीमुळे औंधकारांची चिंता कमी झाली आहे. असे असले तरीही संबंधित कर्मचाऱ्यांना फोन वरून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. सरकारने वारंवार जाहीर करून सुद्धा लोकांकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अशी वागणूक दिली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे