जळगाव अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून मदत जाहीर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवरी २०२१: किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात आभोडा येथील १२, केऱ्हाळा येथील २ आणि रावेर येथील २ असे १६ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर ५ गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे.

“महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेल्या ट्रक अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत पंतप्रधानांकडून मंजूर, तसेच, गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.” असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर या आधी किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा