नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२०: पीएम केअर्स फंडावर लोकसभेत गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या दरम्यान काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केलं. गोंधळामुळं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं.
वास्तविक, या संपूर्ण गोंधळाची सुरुवात अनुराग ठाकूर यांच्या विधानानं होते. अनुराग ठाकूर सभागृहात पीएम केअर फंडाचा हिशोब देत होते. त्यांनी गांधी परिवाराचा उल्लेख केला आणि पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ज्यांना लाभ झालाय त्यांची नावं जाहीर करण्याची धमकी दिली. त्यांच्या वक्तव्याला विरोधी पक्षातील खासदारांनी विरोध केला.
टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी असा आरोप केलाय की लोकसभा अध्यक्ष भाजप सदस्यांचा बचाव करीत आहेत. कल्याण बॅनर्जी म्हणाले की, सभापती नेहमी विरोधी सदस्यांना थांबवतात. कल्याण बॅनर्जी यांनी असंही म्हटलं होतं की जर अध्यक्षांना मला निलंबित करायचं असंल तर ते त्यासाठी तयार आहेत, परंतु यापुढं असं वर्तन त्यांना सहन करता येणार नाही. अधीर रंजन चौधरी यांनीही कल्याण बॅनर्जी यांचे समर्थन केलं. ते म्हणाले की, नवनिर्वाचित सदस्य देखील विरोधी सदस्यांविरूद्ध अपशब्द वापरत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
पीएम केअर्स फंडाचा हिशोब देत होते अनुराग ठाकूर
वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान केअर्स फंडावर सांगितलं की विरोधक केवळ निषेधासाठी विरोध करत आहेत. पीएम केअर फंडला का विरोध केला जातोय याविषयी त्यांनी थोडं तरी स्पष्टीकरण द्यावं. त्यांना नोटाबंदी, जीएसटी, तीन तलक हे सर्वच वाईट दिसलं. पीएम केअर्स फंडाबाबतही सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे