पीएम किसान समृद्धी केंद्रांचे आज लोकार्पण, शेतकर्‍यांना सर्व सुविधा मिळणार एका छताखाली

पुणे, २७ जुलै २०२३ : राजस्थान येथील सिकोर येथून देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १.२५ लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे देशाला समर्पित केली जाणार आहेत. शेतकर्‍यांच्या सर्व गरजांसाठी एकाच जागी उपाययोजना देण्यासाठी ही केंद्रे विकसित केली जात आहेत.यावेळी स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अत्याधुनिक कृषी पध्दती, प्रगतीशील शेतकर्‍यांच्या यशोगाथा, नवनवीन विकसित तंत्रज्ञान, उत्पादने आणि त्यांचे वैज्ञानिक उपयोग यावरील चित्रफित त्याठिकाणी दाखविण्यात येणार आहे.

कृषी क्षेत्रातीशी संबंधित साधने (खते, बियाणे, अवजारे) यांच्या माहितीपासून ते माती, बियाणे आणि खतांच्या चाचणी सुविधांपर्यंत, विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करुन दिली जाईल. पीएम किसान समृद्धी केंद्रे ही शेतकर्‍यांसाठी एक विश्वासार्ह आधार प्रणाली बनेल,असे सांगण्यात आले आहे.

नवीन तंत्रज्ञान विषयावर आधारित शेती विषयक माहितीची आदान-प्रदान या सुविधा केंद्राच्या माध्यमातून केले जाईल. शेतकऱ्यांच्या मालाची सुरक्षितता, दळणवळणाचा पुरेशा सोयीसुविधा आदी बाबी लक्षात घेतल्या जातील. यापुढे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या संपूर्ण प्रश्नांवर एकाच ठिकाणाहून उत्तर मिळवता येतील. शेतकर्‍यांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. येथून शेतकर्‍यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. एकाच छताखाली वाजवी किंमतीमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, आदी दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करुन दिल्या जातील.

मृदा, बियाणे, खते, चाचणी सुविधा शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाधिष्ठित आणि परिपूर्ण सुविधा केंद्रांशी संलग्नीत केल्या जातील. लहान आणि मोठ्या शेती अवजारांची उपलब्धतता अथवा कस्टम हायरिंग सेंटरर्स चांगल्या कृषी पध्दती संदर्भात शेतकर्‍यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाईल. शेतकर्‍यांना संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. अशा वैशिष्ट्यपूर्ण केंद्रावरुन लहान शेतकर्‍यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा