मुंबई: पीएमसी बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे खाते धारकांना भयंकर त्रास झाला होता. या घोटाळ्यामुळे अनेक खाते धारकांनी आपला जीव देखील गमावला होता. झालेल्या या घोटाळ्यामुळे अर् बी आय ने या बँकेतील सर्व व्यवहार सहा महिन्यासाठी स्थगित केले होते. खाते धारकांना मोजकीच रक्कम काढण्याची मुभा होती.त्यानंतर सरकारने या वरील सर्व प्रतिबंध काढले होते. यामुळे सरकारने या बँकेची मालमत्ता जप्त केली होती. आता घोटाळ्याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाने लिलाव प्रक्रियेला गती मिळणार असून PMC बँक घोटाळ्याचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रानुसार PMC बँकेची ‘एचडीआयएल’कडे ४३५५ कोटीची वसुली बाकी आहे. या प्रकरणात ईडीने ‘एचडीआयएल’च्या संचालकांची जवळपास ३८०० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ज्यात अलिबागमधील बंगला, दिल्लीतील हॉटेल्स , आलिशान मोटारी यांचा समावेश आहे. लिलावातून वसुली झाल्यास बँकेवरील निर्बंध दूर होण्याचा मार्ग मोकळा होईल. कोर्टाचा आजचा निर्णय खातेदारांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.