पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा नाही

मुंबई: रिझर्व बँकेने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर खातेदारांच्या पैसे काढण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. हे निर्बंध हटवण्याच्या मागणीबाबत तीन याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे काल सुनावणी झाली. रिझर्व बँकेच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी किती पैसे काढायला हवे हे न्यायालय ठरवू शकत नाही ते रिझर्व बँकेच्या अधिक शेत्रात येते. या टप्प्यावर बँकेच्या अधिकारांबाबत सुनावणी करणे शक्य नाही त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत खंडपीठाने व्यक्त केले.
पीएमसी बँकेच्या खातेदारांना काल मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. वैद्यकीय किंवा अन्य आपत्कालीन कारणांसाठी तातडीने पैसे हवे असल्यास खातेदारांनी रिझर्व बँकेच्या नेमलेल्या प्रशासनाकडे अर्ज करावा असे रिझर्व्ह बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा