मुंबई:पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या खातेदारांची अखेर २७ दिवसानंतर आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी खातेदारांनी भेट घेतली. खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. २९ ऑक्टोबरपर्यत याची अधिकृत घोषणा करावी, अन्यथा ३० ऑक्टोबरपासून आरबीआयविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा खातेदारांनी दिला आहे.
आरबीआयकडून मुंबईमध्ये असणाऱ्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बन्ध लादले आहेत. त्यामुळे खातेदारांना जगणे अवघड झाले आहे.
खातेदारांना मिळाला दिलासा पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँक खातेदारांना आता ५० हजार रुपये काढता येणार आहे. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्वीट वरुन ही माहिती दिली. अगोदर ४०हजार रुपये काढण्याची मुभा होती. त्याव्यतिरिक्त आता ५० हजार रुपये जास्त काढता येणार असल्यामुळे बँक खातेदारांना दिलासा मिळाला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी ही रक्कम काढता येणार आहे.
पीएमसीचे सुमारे १७ लाखांच्या आसपास खातेदार आहेत.शिवाय अनेक लोकांची सेव्हिंग, सॅलरी अकाउंट आणि एफडीचे खातेही आहे.