मांजर पाळण्यासाठी लागणार PMC परवाना

पुणे, १२ नोव्हेंबर २०२२ : Pune Muncipal Corporation पुणे महानगर पालिकेकडं आत्तापर्यंत कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवानगी दिली जात होती. दरम्यान आता मांजर पाळण्यासाठी पुणे महापालिकेने नवीन नियम लागू केले आहेत. यापुढे पुणेकरांना मांजर पाळायचं असल्यास पीएमसी च्या नियमानुसार परवाना घ्यावा लागणार आहे. पुणे महानगर पालिकाच्या आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीनं मान्यता दिली. तसेच पुढील काही दिवसात मांजराचा परवाना घेण्याची प्रक्रिया आॅनलाइन केली जाणार आहे.

पीएमसी आरोग्य विभागाच्या या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून, पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पीएमसी कायद्यातील नियमानुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडं नोंदणी करून त्यासाठी नियमानुसार परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे.

पीएमसी च्या माहितीनुसार कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवानगी लागत होती. पुणे शहरात १ लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत, पण आत्तापर्यंत फक्त ५ हजार ५०० कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे केलेली आहे. मांजराची नोंदणी करण्यासाठी वार्षिक ५० रुपये इतकं शुल्क निश्‍चीत केलं आहे. नोंदणीसाठी नागरिकांच्या राहत्या घराचा पुरावा, ॲटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो या तीन कागदपत्रांची गरज आहे.

तसेच दरवर्षी नव्यानं नोंदणी करावी लागंल. या नोंदणी करताना ५० रुपये परवाना शुल्क आणि अतिरिक्त २५ रुपये शुल्क घेतलं जाणार आहे. तर या संदर्भात स्थायी समितीनं मान्यता दिलीय. पाळीव प्राण्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढत आहे. अनेक शेजारच्या घरात खूप मांजर पाळले आहेत, त्यांचा त्रास होतो. अशा तक्रारीही महापालिकेकडं येतात. यापूर्वी अशा स्वरूपाचे वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेलेले आहेत. त्यामुळं कुत्र्यांप्रमाणे पाळीव मांजराची महापालिकेकडे नोंदणी करणं आवश्‍यक होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा