मिळकत कराचे सर्व्हर डाउन! पुणेकरांची कर भरण्यासाठी धावपळ

29
PMC मिळकत कराचे सर्व्हर डाउन! पुणेकरांची कर भरण्यासाठी धावपळ
मिळकत कराचे सर्व्हर डाउन! पुणेकरांची कर भरण्यासाठी धावपळ

PMC Property Tax Server Down: महापालिकेच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून मिळकत कर विभागाचे सर्व्हर डाउन झाले आहेत. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मिळकत कराचे सर्व्हर डाऊन झाल्याने, नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

मिळकत कर भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने, नागरिक मोठ्या संख्येने कर भरण्यासाठी येत आहेत. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे त्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक नागरिकांनी ऑनलाइन कर भरण्याचा प्रयत्न केला, पण तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही.

महापालिकेने या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वेळेत कर न भरल्यास दंड भरावा लागेल, अशी भीती नागरिकांमध्ये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा