पुणे मनपाची मोठी कामगिरी: टीडीआरपोटी २८५ एकर जागा ताब्यात; ₹५,३४३ कोटींची बचत!

87
पुणे मनपाची मोठी कामगिरी: टीडीआरपोटी २८५ एकर जागा ताब्यात; ₹५,३४३ कोटींची बचत!
पुणे मनपाची मोठी कामगिरी: टीडीआरपोटी २८५ एकर जागा ताब्यात; ₹५,३४३ कोटींची बचत!

PMC TDR Land Acquisition: पुणे महानगरपालिकेने (PMC) गेल्या नऊ वर्षांत विकासकामांसाठी तब्बल २८५ एकर जागा टीडीआर (विकास हक्क हस्तांतरण) च्या माध्यमातून ताब्यात घेतली आहे. या जागेची किंमत ५,३४३ कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे पालिकेने भूसंपादनावर होणारा मोठा खर्च टाळला आहे.

शहराच्या जुन्या हद्दीतील १९८७ च्या विकास आराखड्याचा (DP) फेरआढावा आणि २३ गावांचा डीपी या दोन्हीमध्ये एकूण १,५९८ आरक्षणे आहेत. यापैकी फक्त ३३९ आरक्षणे विकसित झाली आहेत. टीडीआरच्या माध्यमातून ताब्यात घेतलेल्या जागेचा उपयोग रस्ते, उद्याने, रुग्णालये, शाळा, अग्निशमन दल आणि क्रीडांगणे यांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी केला जाणार आहे. बांधकाम विभागाने २०१६ पासून आतापर्यंत टीडीआरच्या माध्यमातून २८५ एकर जागा ताब्यात घेतली आहे.

वर्षानुसार भूसंपादनाची माहिती

PMC Land Acquisition a 285 Acres Acquired via TDR, Saving ₹5,343 Crore for Pune’s Development
  • २०१६-१७: १०.२८ हेक्टर
  • २०१७-१८: २५.६८ हेक्टर
  • २०१८-१९: १०.११ हेक्टर
  • २०१९-२०: १२.५७ हेक्टर
  • २०२०-२१: ८.९२ हेक्टर
  • २०२१-२२: १२.२१ हेक्टर
  • २०२२-२३: ८.२९ हेक्टर
  • २०२३-२४: १२.६७ हेक्टर
  • २०२४-२५: १३.२० हेक्टर

टीडीआरमुळे वाचले हजारो कोटी रुपये
केंद्र सरकारच्या नवीन कायद्यानुसार, भूसंपादनासाठी जमिनीच्या मालकांना रेडी रेकनरच्या दुप्पट मोबदला द्यावा लागतो. त्यामुळे पालिकेला भूसंपादनासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, टीडीआरच्या माध्यमातून जमीन ताब्यात घेतल्यामुळे पालिकेने हजारो कोटी रुपये वाचवले आहेत.

पुणे मनपाचा दूरदृष्टीचा निर्णय

टीडीआरच्या माध्यमातून जमीन ताब्यात घेण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय दूरदृष्टीचा आहे. यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे