अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पीएमपीएलच्या वाहक, चालकांचा सत्कार

पुणे, २५ डिसेंबर २०२०: देशाचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त कसबा मतदारसंघ महिला आघाडीच्या वतीने पीएमपीएलच्या वाहक आणि चालकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     कोरोनाच्या संकटकाळातही पुणेकरांच्या सेवेत राहून आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पीएमपीएलच्या वाहक आणि चालकांचा आमदार मुक्ता टिळक व खासदार श्री गिरीशभाऊ बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
    याप्रसंगी उपमहापौर सौ. सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने, पीएमपीएल अध्यक्ष श्री शंकर पवार, नगरसेविका सौ. गायत्री खडके, नगरसेवक श्री राजेश येनपुरे, व्यवस्थापक श्री दत्तात्रय झेंडे, पुणे शहर महिला अध्यक्ष अर्चना पाटील, कसबा मतदार संघ महिला आघाडी अध्यक्ष आश्विनी पांडे, कसबा मतदार संघ अध्यक्ष श्री प्रमोद कोंढरे तसेच पीएमपीएल वाहक, चालक आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा