पुणेकरांनो, वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यासाठी सज्ज व्हा!

46
A road construction and encroachment removal scene on Pune-Satara and Pune-Solapur Road. Bulldozers and workers are actively clearing the roadside, with people walking and observing the operation. A road sign indicates directions for Pune, Satara Road, and Solapur Road. Buildings and greenery are visible in the background.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी 'पीएमआरडीए'ने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजारांहून अधिक अतिक्रमणांवर धडक कारवाई.

PMRDA’s second phase of anti encroachment: पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजारांहून अधिक अतिक्रमणांवर धडक कारवाई केल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्याला आजपासून (दि. १७) सुरुवात झाली आहे. ही मोहीम ३० मार्चपर्यंत सुरू राहणार असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील दमदार कामगिरी;

पहिल्या टप्प्यात पुणे शहर पोलिस, पिंपरी चिंचवड शहर पोलिस, पुणे ग्रामीण पोलिस, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एमएसईबी आदी शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन ३ ते १३ मार्चदरम्यान अडीच हजारांहून अधिक अतिक्रमणांवर कारवाई केली.

या कारवाईमध्ये महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगत असणारी दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली.

  • पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी ते सांडभोरवाडी, पुणे-सोलापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी, चांदणी चौक ते पौड रस्त्याच्या बाजूस कारवाई करत ५५,७०० चौरस फूट क्षेत्रफळ मोकळे करण्यात आले.

दुसऱ्या टप्प्याची योजना

  • दुसऱ्या टप्प्यात पुणे शहरातील महामार्गासह मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १७ ते ३० मार्चदरम्यान संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे.
  • यामध्ये पुणे-सातारा रोड (नवले ब्रीज ते सारोळे), सुस रोड, हडपसर ते दिवेघाट, नवलाख उंब्रे ते चाकण, हिंजवडी परिसर-माण, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गांवर कारवाई होणार आहे.
  • ‘पीएमआरडीए’, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
    पुणेकरांनो, वाहतूक कोंडीमुक्त शहरासाठी प्रशासनाला सहकार्य करा!

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा