पोलीस नाईकला लाच स्विकारताना पकडले रंगेहात.

उस्मानाबाद, ३० जुलै २०२० : उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक आतिष दशरथ सरपाळे यास आज दिनांक ३० जुलै रोजी उस्मानाबाद येथील सीटी हॉटेल मध्ये ३०००/- रुपयांची लाच स्विकारताना पोलीसांनी रंगेहात पकडले.

शेतावरील बांध्याच्या कारणावरून तक्रारदार याचे त्याच्या चुलत भावाशी भांडण झाले असता, तो जखमी झाला आणि उस्मानाबाद येथीलच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होता.त्या भागातील पोलीस चौकीत कार्यरत असणारे पोलीस नाईक आतिष दशरथ सरपाळे यांनी तक्रारदाराचा चांगला जबाब घेण्यासाठी तसेच डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेऊन देण्यासाठी, संबंधित तक्रारदारास ५०००/- रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोड केल्यानंतर अखेर ३०००/- एवढी रक्कम ठरली गेली. मात्र, संबंधित तक्रारदाराची लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे, त्यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय येथे या प्रकरणाबाबत तक्रार केली.

तक्रारदाराने दिलेल्या या तक्रारीनंतर, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला प्र वि औरंगाबाद व प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पो नि अशोक हुलगे, पो.ह. रवींद्र कठारे,पो. ना. मधुकर जाधव,अर्जुन मारकड पो. शि. विष्णू बेळे, समाधान पवार,महेश शिंदे व चालक ज्ञानदेव कांबळे यांनी केलेल्या कार्यवाही द्वारे आज दिनांक ३० जुलै रोजी संबंधित पोलीस नाईक आतिष दशरथ सरपाळे यास उस्मानाबाद येथील सीटी हॉटेल येथे ३०००/- रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा