पुणे, ७ सप्टेंबर २०२३ : लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येत असताना, गुंगीचे औषध देऊन पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन नंतर दबाव आणत तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी खडक पोलिसांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या दीपक सिताराम मोघे, या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दखल केला आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९४/२३) दिली आहे. हा प्रकार पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सिद्धेश शिगवण