मेडद येथे दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

बारामती (मेडद), दि. ३० मे २०२०: बारामती येथे सध्या कोरोना संसर्गामुळे व्यवसाय करण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. संध्याकाळी सरकार मान्य दारूची दुकाने बंद झाल्यावर काही तळीराम मग दारूच्या शोधात भटकत असतात. त्यामुळे शहरापासून जवळ असणाऱ्या भगत अवैध गावठी हातभट्टी तयार करणाऱ्याचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काल गोपनीय विभागाने या अड्ड्यावर छापा टाकला आहे.

बारामती पुणे रस्त्यावर असणाऱ्या मेदड गावात ही कारवाई करण्यात आली या मध्ये दोन आरोपीं विरूध्द कारवाई करून ६६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बारामती तालुक्यातील मेडद येथे कऱ्हा नदीच्या पात्रांमध्ये गावठी हातभट्टी तयार करण्याचे काम चालू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली होती. त्यानुसार बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने गावठी हातभट्टी तयार करणाऱ्यांची त्यांची माहिती मिळवली व कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सदर पथकातील जवानांनी मेडद येथे जाऊन नदीच्या पात्रातील आरोपी सुदाम बागाव व काळू बगाडे या दोन आरोपींचे दारुअड्डे उद्ध्वस्त केले.

सदर ठिकाणी  ४८ हजार रुपयांचे १६०० लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन, १५ हजार रुपए किमतीचे पाच मण सर्पण ३ हजार ६०० रुपये किमतीचे बारा लोखंडी बॅरल असा एकुण ६६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे आरसीपी पथकातील दोन पोलिस जवान, तसेच बारामती तालुका पोलिस स्टेशनचे  पोलीस जवान विनोद लोखंडे, नंदू जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा