मुंबई, १३ ऑगस्ट २०२२: काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट खूप व्हायरल झालं होतं. ज्यावरून रणवीरही वाद-विवादांनी घेरला होता. एका एनजीओ व्यक्तीने तर रणवीर सिंगविरोधात एफआयआरही दाखल केला होता. रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट पाहून महिलांच्या मनात लाज निर्माण होईल, असं तो म्हणाला. रणवीरची नग्न छायाचित्रं ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून हटवण्यात यावीत, अशीही त्यांची मागणी होती. या संदर्भात मुंबई पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले.
रणवीर सिंग घरी सापडला नाही
चेंबूर पोलीस रणवीर सिंगला नोटीस बजावण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्याला ही नोटीस १६ ऑगस्टपर्यंत सोपवायची आहे, मात्र अभिनेता मुंबईबाहेर गेला आहे. घरी न सापडल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतले. रणवीर सिंगला २२ ऑगस्टला चेंबूर पोलिसात हजर राहावे लागेल, असं नोटीसमध्ये लिहिलंय. रणवीरविरुद्ध आयपीसी कलम ५०९, २९२, २९४, आयटी कायद्याच्या कलम ६७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
रणवीर सिंगने पीपल्स मॅगझिनसाठी हे न्यूड फोटोशूट केले आहे. वाढत्या वादामुळं संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीने अभिनेत्याला पाठिंबा दिला. त्यात आलिया भट्ट, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, मसाबा गुप्ता, अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिया मिर्झा, राम गोपाल वर्मा, पूनम पांडे यांचा समावेश आहे. या न्यूड फोटोशूटसाठी दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला सर्वाधिक सपोर्ट केला. या शूटिंगदरम्यान अभिनेत्री पतीसोबत राहिली. त्याला ते करण्याबाबत खूप आत्मविश्वासही दिला. मात्र, दीपिका पादुकोणने याबाबत कोणतेही वक्तव्य केलं नाही.
रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा ‘जयेशभाई जोरदार’मध्ये दिसला होता. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तो नंतर Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. याशिवाय रणवीर सिंगचे दोन चित्रपट आहेत. रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ आणि करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे














































