बटामालू येथे दहशतवाद्यांनी पोलिस अधिकाऱ्यावर झाडल्या गोळ्या, उपचारादरम्यान मृत्यू

जम्मू-काश्मीर, 8 नोव्हेंबर 2021: जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले वाढत आहेत.  आता श्रीनगरच्या बटमालू भागात एका दहशतवाद्याने पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केलाय.  तौसीफ असं पोलीस निरीक्षकाचं नाव असून तो बटामालू येथे पीसीआरच्या पोस्टिंगवर होता.  घटनेनंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 काश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या
रविवारी संध्याकाळी बटामालूच्या एसडी कॉलनीत दहशतवाद्यांनी तौसिफ अहमदवर गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.  पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली.  हल्ल्यानंतर तौसीफ गंभीर जखमी झाले आणि त्यांना जवळच्या SMHS रुग्णालयात नेण्यात आलं.  मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
 रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कंवलजीत सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूला दुजोरा दिलाय.  अगदी जवळून गोळी झाडण्यात आली, त्यामुळं तौसिफ यांचा लवकर मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.  आतापर्यंत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नसून लष्कर आणि पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.  परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.
 कुलगाममध्ये ग्रेनेड हल्ला
याबरोबरच काल कुलगाममध्येही दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला.  रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाल्याने त्या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.  सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे.  गेल्या महिन्यापासून खोऱ्यात अनेक दहशतवादी घटना पाहायला मिळत आहेत.  केवळ पोलिस अधिकारी आणि सुरक्षा दलांनाच लक्ष्य केले जात नाही, तर अनेक बाहेरील लोकांवरही प्राणघातक हल्ले होत आहेत.
या सततच्या हल्ल्यांमुळं खोऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.  अनेक वर्षांनंतर स्थलांतराचे युगही पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.  अनेक बाहेरचे लोक आता काश्मीर सोडून जम्मूला जात आहेत.  प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी वाटू लागली आहे.  सुरक्षा दल दहशतवाद्यांना निश्चितच चोख प्रत्युत्तर देत आहेत, परंतु अलीकडच्या घटनांमुळं परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा