दौंडज येथे पोलीस पाटील व तरुणांनी बुजवले खड्डे

पुरंदर, १२ ऑक्टोबर २०२०: पुणे पंढरपूर महामार्गावर पुरंदर तालुक्यातील दौंडज येथे शनिवारी पहाटे खड्डे चुकवताना एक माल वाहतूक ट्रक ओढ्यामध्ये जाऊन पडला होता. यानंतर आता दौंडज गावाचे पोलीस पाटील व येथील तरुणांनी स्वखर्चातुन मुरूम आणून हे खड्डे बुजवले आहेत. प्रशासनाने मात्र अजूनही याकडे दुर्लक्षच केले आहे.

पुणे पंढरपूर मार्गावर जेजुरी ते नीरा या दरम्यान रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून जाताना अनेक वाहनांना अपघात झाला आहे. अनेक दुचाकी स्वरांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. पोलिसांनीसुद्धा याबाबत बांधकाम विभागाला कळवले आहे. मात्र तरी देखील बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने पाहत नाही. शनिवारी पहाटे एक ट्रक खड्डे चुकवताना ओढ्यात गेला. यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले. यानंतर आता दौंडज येथील तरुणांनी पोलीस पाटील दिनेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे खड्डे मुरूम टाकून बुजवले.

यावेळी माध्यमांशी बोलताना पोलीस पाटील जाधव म्हणाले की, या रस्त्यावर खड्डे पडल्याने नेहमीच छोटे मोठे आपघात होतात. येथील तरुण यावेळी मदतीला धावून जातात. पण सततच्या अपघाता मुळे तरुणांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. डोळ्या देखत एखाद्याचा मृत्यू पाहण्याची वेळ या तरुणांवर येते. त्यामुळे तरुणांनी खड्डे बुजवण्यात पुढाकार घेतला आणि स्वतः खर्च करून मुरूम आणला आहे. तरुणांनी चांगला उपक्रम राबवला असला तरी प्रशासनाने हे खड्डे डांबर टाकून बुजवले आवश्यक आहे. तरच येथील अपघात कमी होतील व लोकांचे उध्वस्त होणारे संसार वाचतील.

न्युज अनकट प्रतीनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा