संचार बंदीमुळे गस्त घालणाऱ्या पोलिसांना मारहाण

सिरसाळा (बीड) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोटारसायकलवर पेट्रोलिंग करणाऱ्या दोघा पोलिसांना दहा-बारा जणांच्या गटाने मारहाण केल्याची घटना सिरसाळा गावातील पवार गल्लीत बुधवारी ( ता.२५)साडे चार दरम्यान घडली. सर्व दहाजणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सीरसाळा या गावी ही घटना घडली. कोरोनाचं संकट बाहेर असताना पोलीस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पोलीस नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत आहे. मात्र, आता पोलिसांवरतीच हात उगारले जात असतील तर अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. किशोर कचरू घटमल व संतोष जेटेवाड अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. हे पोलीस आज चार दरम्यान पवार गल्लीतून जात असताना तुम्ही रस्त्यावर का थांबत आहात, घरात बसा, असे सांगत असताना आमच्या गल्लीत का आलात, असा प्रश्न पोलिसांना केला.

सिरसाळा पोलीस स्टेशनचे तीन पोलीस सीरसाळा शहरांमध्ये असलेल्या वडार कॉलनीमध्ये गस्त घालत होते. यावेळी घराच्या बाहेर का थांबलात? असे विचारल्यानंतर अशोक पवार याने पोलीसांवर लाकूड फेकून मारले. यानंतर पोलीस आणि दहा ते बारा आरोपी यांच्यात मारामारी सुरू झाली. यावेळी एकूण तीन पोलीस घटनास्थळी होते. त्या ठिकाणी वाद इतका वाढला की पोलिसांना आरोपीच्या कुटुंबीयांनी विटा आणि हाताने मारायला सुरुवात केली. यानंतर राम तुकाराम पवार, अशोक तुकाराम पवार, श्रीराम बाबू पवार, दत्ता हरीचंद्र देवकर, विकास अर्जुन मिटकर, विलास अर्जुन मिटकर, सोनाली राम पवार, राम तुकाराम पवार, अनिल जाधव, आणि आणखी दोघा अज्ञातांनी पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी, लाकूड फेकून मारहाण करण्यात आली.

यात पोलीस कॉन्स्टेबल किशोर घटमाळ यांच्या करंगळीला मार लागला. जवळपास अर्धा तास शिरसाळा मधल्या वडार कॉलनीमध्ये हा गदारोळ चालू होता. या सर्वांवर कलम 353 नुसार गुन्हा नोंद झाल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. या घटनेतील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पीएसआय श्री. पुरी करीत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा