उदगीरच्या सात कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांचा पहारा

लातूर, दि.१९ मे २०२०: उदगीरमध्ये गेल्या पंचवीस दिवसांमध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येचा एकूण आकडा ४४ वर पोहोचलेला आहे. २५ एप्रिल रोजी कोरोना बाधित वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर शहरातील एक मोठा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाच्यावतीने आजपर्यंत एकूण सात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेली आहेत. या झोनमध्ये पोलिसांचा खडा पहारा सुरू आहे.

उदगीरमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे आनंदनगर आणि सोमनाथपूर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पाठीमागील वस्ती असे दोन परिसर कंटेनमेंट झोन ४ व ५ असे शनिवारीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी घोषित केले आहे.

तर शहरातील गोविंदनगर भागात एक तर उदगीर जवळ असलेल्या बोरताळा तांडा येथे मुंबई येथून आलेले नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी रविवारी सायंकाळी हे दोन्ही परिसर कंटेनमेंट झोन ६ व ७ असे घोषित केलेली आहेत. हा परिसर ३० मे पर्यंत सील करण्यात आलेला आहे.

यापूर्वीच्या पहिल्या कंटेनमेंट झोन मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने या झोनची मुदत पुन्हा १४ दिवसांनी दिनांक २३ मे पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तर कंटेनमेंट झोन मुसानगर ( झोन क्रमांक २ ) आणि मदिनानगर ( झोन क्रमांक ३ ) या दोन झोनची १४ दिवसांची मुदत संपलेली आहे. सध्या उदगीरात एकूण पाच कंटेनमेंट झोन परिसरात पोलिसांचा २४ तास खडा पहारा आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा