औरंगाबाद रेल्वे रुळावर पोलिसांची गस्त

औरंगाबाद, दि.१२ मे २०२० : करमाड येथे रेल्वे मालगाडीखाली चिरडून १६ मजूर ठार झाल्याची घटनेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या सूचनेनुसार चिकलठाणा पोलिसांनी रेल्वे पटरीवर गस्त सुरू करण्यात आली आहे.

लॉकडाउनमुळे अनेक परप्रांतीय मजूर शहराच्या विविध भागात अडकले आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने विशेष रेल्वेची सोय करून दिली आहे. ८ मे रोजी काही मजूर गावी जाण्यासाठी जालन्याहून
औरंगाबादकडे येत होते. मात्र पायी चालून पहाटे थकवा आल्याने रेल्वे रुळावरच झोपले. पहाटे आलेल्या मालगाडीखाली चिरडून १६ मजूरांचा मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी घटना घडू नये, म्हणून औरंगाबाद पोलिसांनी रेल्वे रुळावर गस्त घालण्यास सुरवात केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा