बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस कर्मचारी तैनात

बारामती  १४ जानेवारी २०२१ : बारामती उपविभागातील बारामती तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.१५ ) मतदान होणार असुन आज एमआयडीसी मधील रिकरेशन हॉल मध्ये सर्व कर्मचाऱ्यांना इ व्ही एम मशीन व मतदानाचे साहित्य ताब्यात देण्यात आले असुन मतदान शांततेत पार पडण्यासाठी तालुक्यात ४ पोलीस निरीक्षक २० अधिकारी २०० पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
बारामती तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती पैकी २ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असुन.एका ग्रामपंचायतीत उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक होणार नाही.त्यामुळे ४९ ग्रामपंचायतींसाठी १९९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. बारामती तालुक्यात १००८ उमेदवार निवडणूक रिंगणात असुन मतदान शांततेत पार पडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यामध्ये ३०० होमगार्ड २ आरसीपी तुकड्या,२ स्टायकिंग पथक १७ पेट्रोलिंग वाहने तैनात असणार असुन पाच गावांसाठी एक वाहन एक अधिकरी व २ होमगार्ड पेट्रोलिंग करणार असुन निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्व खबरदारी घेतली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली आहे.६४ लोकांना दोन दिवसांसाठी तडीपार केले असुन त्यांनी सकाळी सात ते नऊ या वेळेत मतदान करायचे आहे. कुठे काही अनुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा