पैठण शहरातील खाटीक वाड्यात पोलिसांची धाड; ३५० किलो गोमांसासह २१० जनावरांची कातडी जप्त

पैठण, २० एप्रिल २०२४ : पैठण शहरातील खाटीक वाड्यात पोलिसांनी धाड टाकत ३५० किलो गोमांसासह २१० जनावरांची कातडी जप्त केली आहे.

पैठण शहरात चोरून लपून गोमांस विक्री होत असल्याच्या माहितीवरून काल भल्या पहाटे पैठण शहरातील खाटीक वाड्यात ग्रामीण पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक व पैठण पोलिसांनी संयुक्त रित्या धाड मारली. यावेळी तिथे गोमास विक्री करणारे पाच ते सहा जण मिळून आले. मात्र अंधाराचा फायदा घेत तीन आरोपींनी पळ काढला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून या धाडीत पोलिसांनी जवळपास ३५० किलो गोमांस आणि २१० वेगवेगळ्या जनावरांच्या कातडीसह एकूण १ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : मनोज परदेशी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा